Posts

अजि म्या "प्रभू" पाहिले

निर्माता - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराज अष्टक ' या संकल्पनेतील पावनखिंड हे तिसरे सोनेरी पान. पु. लं.च्या भाषेत सांगायचं झालं तर केवळ हरितात्यांच्या " काकदृष्टी "सच दिसलेला आणि त्यांच्या तोंडून लक्ष वेळा ऐकलेला हा पावनखिंडीतला रणसंग्राम आज आपण पाहणार, म्हणून सिनेमा पाहताना एक वेगळाच हुरूप आला होता. पन्हाळगडाला आदिलशाही मातब्बर सरदार सिद्दी जौहर ने वेढा दिला आणि महाराजांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याला शह देण्यासाठी महाराज कोंडी फोडून पन्हाळ्याहून निसटतात आणि अक्षरशः हजारो अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत विशाळगडावर पोचतात. पण यादरम्यान रात्रभर अनवाणी सह्याद्रीच्या कडेकपारीतून धो धो कोसळणाऱ्या पावसात धावून थकलेल्या परंतु शिव-ऊर्जेने भारलेल्या 300 धारकरी मावळ्यांनी 10000 च्या प्रचंड आदिलशाही फौजेला एक दोन नव्हे तर तब्बल नऊ तास घोडखिंडीतच असं रोखून धरलं की त्यांना इंचभर ही पुढे जाता आलं नाही... ही इतिहासातील अजरामर, प्रेरणादायी कथा इथे मांडली आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे याची तगडी स्टारकास्ट.... चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, हरीश दुधाडे,...